भुसावळ तालुका पोलिसांनी २४ तासात केला कुऱ्हा पानाचे येथील खूनाचा उलगडा !

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे झालेल्या रखवालदार खून प्रकरणाचा तपास अवघ्या २४ तासात उलगडा केल्याने भुसावळ तालुका पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

या बाबत माहिती अशी की, संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सदाशिव राजाराम डहाके हा कुऱ्हा पानाचे येथील अण्णा शिंदे यांच्या शेतात रखवालदार म्हणून काम करत होता त्याचे कुऱ्हा पानाचे येथील खळ्यात वास्तव्य होते. दि.१४ फेब्रुवारी रोजी दिपक पितांबर पाटील हे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्या खळ्याच्या बाजूला असलेल्या अण्णा शिंदे यांच्या खळ्यामध्ये दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना सदाशिव राजाराम डहाके हे पलंगावर झोपलेले दिसले. त्यांनी त्यांना आवाज देऊन उठवले असता ते उठले नाहीत ते मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिपक पाटील यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन ला दिलेल्या खबरी वरुन पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

परंतु शवविच्छेदन अहवालात मृतदेहात अंतर्गत जखमा असल्याचे समजल्यावर तसेच मारहाणीची माहिती ही पोलीसांना मिळाली. या बाबत मोंढाळा ता भुसावळ येथील दूध विक्रेता अनिल संतोष धनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात लक्ष्मण गणेश शिराळे रा. शेलवड ता बोदवड याच्या बाबत माहिती मिळाली. तो पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्यास मोंढाळा येथून शिताफीने अटक करण्यात आली. जून्या वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वरी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बबनराव जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोऊनि पूजा अंधारे, एक एस आय विठ्ठल फुसे, पोहेकाॅ संजय तायडे, युनूस शेख , प्रेमचंद सपकाळे, दिपक जाधव, वाल्मिक सोनवणे, आत्माराम भालेराव, रियाजोद्दीन काझी, पोना कैलास बाविस्कर, जितेंद्र साळुंखे, पोकाॅ उमेश बारी, रशिद तडवी यांनी केली. २४ तासात खूनाचा उलगडा झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी भुसावळ तालुका पोलीसांचे कौतुक केले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

राहुल गांधींच्या प्रतिमेचा मंदिरात डोअरमॅट म्हणून वापर, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

राहुल गांधींच्या अलीकडील टिप्पण्यांना प्रतिसाद म्हणून, ज्यांना हिंदूंबद्दल अपमानास्पद समजले गेले होते, महाराष्ट्रातील एका मंदिरात काँग्रेस खासदाराच्या प्रतिमेसह डोअरमॅट म्हणून

मुलींच्या लग्नाला शासनाकडून १० हजाराची आर्थिक मदत

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; 400 हून अधिक भाविक जखमी

ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 400 हून अधिक भाविक जखमी झाले. त्याचवेळी एका भाविकाचा

धक्कादायक ! दुचाकीच्या भीषण अपघातात तरूण ठार तर दुसरा गंभीर जखमी

जळगाव – जळगाव तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील महेंद्रा शोरूम येथे जात असताना स्पीडब्रेकरवरून दुचाकी उधळून डिव्हायडरला धडक लागल्याने वाहनावरील तरुण ठार

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून