कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग?

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग?

अंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अनेक राज्यातील इंधनाच्या दरात बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $81.20 आणि WTI क्रूड प्रति बॅरल $76.21 वर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण राज्यातील विविध शहरांमध्ये तेलाच्या किमतीत किरकोळ बदल झालेला दिसून आला आहे.

देशातील तेल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Price) जाहीर केले आहेत. अशातच महाराष्ट्रात पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

कोलकात्यात पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरवर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

2. महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०५.७७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.३० रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

नाशिकमध्ये पेट्रोल १०५.८९ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९२.४२ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.५९ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.८४ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.५३ रुपये प्रति लिटरने मिळतंय.