कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल यांची कांग्रेस निराधार निराश्रित सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

प्रतिनिधि – अमीर पटेल

यावल – मुंबईत कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या शिफारशीने आणि त्यांच्या हस्ते त्यांचे निकटवर्तीय कोरपावलीचे माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांची काँग्रेसच्या निराधार निराश्रित सेलच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती निराधार सेलच्या प्रदेशाध्यक्षा राधिका मखमाले यांनी केली यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस सामान्य प्रशासन प्रमोद मोरे, वाघमारे मॅडम, सुरेखा मॅडम, आणि प्रदेश पदाधिकारी सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते सदर निवडीबाबत जलील पटेल यांचे आमदार शिरीषदादा चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार,जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, जिल्हा सरचिटणीस न्हयानेश्वर कोळी, जमील शेख,जिल्हा महानगर अध्यक्ष शाम तायडे सह काँग्रेसच्या प्रदेश जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.