दुचाकी चालवताना फोनवर बोलणे पडले महागात, दोघांनवर गुन्हा दाखल.

जळगाव – दुचाकी चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्या उत्तरप्रदेशातील गुलफाम दीन मोहम्मद (वय २९, रा. किनवा, शामली, उत्तरप्रदेश) या तरुणावर शहर पोलिसांनी कारवाई केली. ही घटना दि. १० रोजी दुपारच्या सुमारास टॉवर चौकात घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शहरातील टॉवर चौकात शहर पोलिसांकडून बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली जात आहे. दुचाकी चालवितांना मोबाईलवर बोलणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. दरम्यान, गुलफाम दीन मोहम्मद हा परप्रांतीय तरुण (यूपी १९ आर ८०८८) क्रमांकाच्या दुचाकीवरुन टॉवर चौकातून जात असतांना मोबाईलवर बोलत भरधाव वेगाने जात होता, यावेळी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांनी त्याला थांबवित त्याच्यार कारवाई केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात पोहेको शैलेंद्र बाविस्कर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों राजीव जाधव हे करीत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh