अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूचं कारण समोर, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार करण्यात आला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नरोना या व्यक्तीनं गोळीबार केला.

दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यानं स्वत:वर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा अति रक्तस्त्राव आणि हॅमरेज शॉक यामुळे झाल्याचं जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. घोसाळकर यांना या घटनेत चार गोळ्या लागल्याचं समोर आलं आहे. अभिषेक यांच्यावर मॉरिसनं गोळीबार केला, या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी बोरिवलीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं. अति रक्तस्त्रावामुळे घोसाळकर यांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे.

दरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नरोना यानं फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळीबार केला. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यानं स्वत:वर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मॉरिसच्या पत्नीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, त्याने तिच्यासमोर अनेकदा आपण अभिषेक घोसाळकर यांना संपवणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र तिने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.