“गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल..,” वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई – पार्थ पवार , श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अट्टल गुन्हेगारांसोबत फोटो पुढे आल्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासबोत पुण्यातील अट्टल गुन्हेगार नीलेश घायवळ सोबतचा फोटो समोर आला आहे.

खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट केला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली आहे. राज्यात गुंडाराज असल्याचे पुन्हा सिद्ध झाले असल्याचे म्हणत गुंड लोकशाहीचा आणि विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी पाळले आहे का असा सवाल देखील राऊतांनी केला. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर जोरदार टिका केली आहे.

सुरूवातीला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याने अजित पवारांचे सुपत्रू पार्थ पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांची कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड येथील गुंड आसिफ शेख उर्फ दाढी याला भेट देत असल्याचा फोटो पुढे आला होता. त्यावरून राज्यात विरोधकांनी सरकारवर जोरदार टिका केली.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती “मोदी की गॅरंटी” ? असा खोचक सवाल देखील त्यांनी केला.

गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे.

राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे.

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर…

jalgaonsandesh

jalgaonsandesh