जळगाव – : तालुक्यातील ममुराबाद येथे भव्य अशा अश्वरूढ पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गावातील रहिवाशी श्री फकिरा पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश दामु भोळे, भिमराव मराठे, सरिता माळी, रवि देशमुख, ममुराबाद गामपंचायत सरपंच हेमंत चौधरी, सर्व सन्माननिय सदस्य, आणि गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ममुराबाद येथे अनावरण करणे, ही एक ऐतिहासिक गोष्ट आहे. आम्ही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊ शकलो यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज कृती समितीचे आभार व्यक्त करतो, अशा भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी हा परिसर दुमदुमला होता.
पुढे बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य प्रत्येक देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे. हा पुतळा ममुराबाद येथे उभारला जाणे, हे कौतुकास्पद आहे. निधड्या छातीने हातात तलवार घेऊन उभा असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा एक प्रकारे आपल्याला काहितरी आठवण करूण देत आहे. शिवाजी महाराजांचा हा पुतळा प्रत्येक सैनिकाला कायम ऊर्जा देण्याचे काम करेल, असेही मत यावेळी गुलाबराव पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.