जरांगे यांचं वादग्रस्त विधान; “तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील”

मुंबईपर्यंत मोर्चा काढून मराठा आरक्षणाचा अध्यादेश मिळाल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे अजूनही काही गोष्टींवर आक्रमक आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत असल्याचा आणि मागच्या दारातून मराठ्यांना आरक्षण दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळांनी केला होता.

त्या दोघांमधील वाद अद्याप थांबलेला नसून आता मनोज जरांगेनी पुन्हा भुजबळांना खडे बोल सुनावत टीका केली आहे. ‘तू ओबीसींच वाटोळं केलं आहे. आम्ही ओबीसींचे वाटोळे होऊ देणार नाही. ‘अशा शब्दांत मनोज जरांगेची पुन्हा भुजबळांना खडे बोल सुनावत टीका केली आहे. ‘तू ओबीसींचं वाटोळं केलं आहे, आम्ही ओबीसींचे वाटोळे नाही होऊ देणार ‘ अशा शब्दांत मनोज जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. तू गप्प बस नाहीतर टपकन वर जाशील, असं धक्कादायक विधान करत त्यांनी भुजबळांना इशारा दिला.

“तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील”

तू ओबीसींचे वाटोळे केले आहे. पण आम्ही ओबीसींचे वाटोळे नाही होऊ देणार. तुझं वय झालं आहे आणि या वयात एवढा लोड झेपत नाही. तू गप्प बस नाही तर टपकन वर जाशील अशा शब्दात मनोज जरंगे यांनी भुजबळांना इशारा दिला. गप्प रहा यडपट माणूस आहे. हे कसे ओबीसींच्या हाताला लागले, ओबीसींचे वाटोळे करत आहे.

मला म्हणतो उपोषण करू नको, तू नको करू आंदोलन, गप्प पड एका जागी. तू माझ्या नादी लागू नको, तुझे वय झाले आहे. तुझ्या वयानुसार आम्ही तुझा आदर करू. तू गप्प बसला तर आम्ही तुझा शंभर टक्के आदर करू. पण जर गप्प बसला नाही तर तुला मी काही सोडत नाही, असेही मनोज जरांगेंनी भुजबळांना सुनावले.