भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ शहर कार्यकारणी ची निवड

भुसावळ – येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत तालुका शाखा भुसावळ तथा जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज रविवार दिनांक २८/०१/२०२४ रोजी भुसावळ शहर कार्यकारणीची निवड शीलरत्न बुद्ध विहार चांदमारी चाळ, सात नंबर पोलीस चौकीच्या मागे, आंबेडकर मार्ग, या ठिकाणी संपन्न झाली.

निवड प्रक्रियेसाठी जिल्हा पदाधिकारी, महिला पदाधिकारी, त्याचप्रमाणे तालुका कार्यकारणीचे पदाधिकारी, बौद्धाचार्य माजी कार्यकर्ते बऱ्याच मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा शहरशाखे मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेले व्यक्ति उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला कार्यकरणीतील पदाधिकारी, यांनी आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांना पुष्प अर्पण करून दीप धूप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील घेऊन केली.

उपस्थित मान्यवर कार्यकर्त्यांचे, महिला कार्यकर्त्यांचे, स्वागत पुष्प देऊन तालुका कार्यकारणी च्या वतीने करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले बौद्धाचार्य म्हणून पास झालेले आनंद सपकाळे, गौतम सपकाळे, या दोघं बौद्धाचार्यांचे स्वागत जिल्हा कार्यकारणी,व तालुका कार्यकारणी च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. तसेच फैजपुर तालुका यावल या ठिकाणी समता सैनिक दलाच्या शिबिराचे प्रमाणपत्र आदरणीय वसंतदादा लोखंडे यांना सपुष्प देऊन देण्यात आले. स्वागत समारंभा नंतर, शहर कार्यकारणी मध्ये कार्य करण्यासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांनी संस्थेच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतला. फॉर्म भरून दिल्यानंतर त्यामधून शहराध्यक्ष म्हणून संभाजी सोमा सोनवणे, सरचिटणीस म्हणून गौतम त्र्यंबक सपकाळे, शहर कोषाध्यक्ष म्हणून अनिल आराक आणि संस्कार प्रमुख म्हणून गवई दादा व पर्यटन सचिव म्हणून भीमराव छगन साळुंखे या मान्यवरांची निवड करण्यात आली. व निवड झालेल्या मान्यवरांचे स्वागत उपस्थित कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय लताताई अरुण तायडे नाशिक जिल्हा प्रभारी, तथा महाराष्ट्र कार्यकारणी संघटक, प्रियंका ताई अहिरे महिला जिल्हा अध्यक्ष, जिल्हा हिशोब तपासणीस आदरणीय सुमंगल रवींद्र दादा अहिरे, आदरणीय वसंत दादा लोखंडे प्रचार पर्यटन उपाध्यक्ष, आदरणीय कर्नल युवराज नरवाडे प्रचार पर्यटन सचिव, भुसावळ तालुका अध्यक्ष उत्तम सुरवाडे. या मंडळींनी निवड झालेल्या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले

सरचिटणीस अरुण गंभीर तायडे कोशाध्यक्ष कैलास सपकाळे, प्रवीण जीवन डांगे तालुका हिशोब तपासणीस, आनंद आर सपकाळे तालुका संस्कार, आदरणीय श्रावण साळुंखे दादा, त्याचप्रमाणे संभाजी सोनवणे, भीमराव साळुंखे, सुनिल आराक, जितेंद्र मधुकर सोनवणे, एकनाथ पांडव, गवई दादा, गौतम टी सपकाळे, ही सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी अगत्याने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषण तालुका अध्यक्ष उत्तम सुरवाडे यांनी केले व आभारसुद्धा मानले. सरणत्तय झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण गंभीर तायडे यांनी केले

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

राहुल गांधींच्या प्रतिमेचा मंदिरात डोअरमॅट म्हणून वापर, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

राहुल गांधींच्या अलीकडील टिप्पण्यांना प्रतिसाद म्हणून, ज्यांना हिंदूंबद्दल अपमानास्पद समजले गेले होते, महाराष्ट्रातील एका मंदिरात काँग्रेस खासदाराच्या प्रतिमेसह डोअरमॅट म्हणून

मुलींच्या लग्नाला शासनाकडून १० हजाराची आर्थिक मदत

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; 400 हून अधिक भाविक जखमी

ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 400 हून अधिक भाविक जखमी झाले. त्याचवेळी एका भाविकाचा

धक्कादायक ! दुचाकीच्या भीषण अपघातात तरूण ठार तर दुसरा गंभीर जखमी

जळगाव – जळगाव तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील महेंद्रा शोरूम येथे जात असताना स्पीडब्रेकरवरून दुचाकी उधळून डिव्हायडरला धडक लागल्याने वाहनावरील तरुण ठार

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून