Reels पाहू नका…! पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिले १० कानमंत्र

नवी दिल्ली –  आणि बारावी बोर्डाच्या परिक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणार आहेत. या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि.२९) देशभरातील दहावी – बारावी विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला.

दिल्ली येथील भारत मंडपम येथे हा संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी चर्चा केली. बोर्ड परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना तणाव आणि भीती कमी करण्यासाठी कानमंत्र दिलेत.

विद्यार्थ्यांना रिल्स पाहण्याचे सांगितले तोटे

तुम्ही एकामागून एक रिल्स पहात राहिल्यास वेळ वाया जाईल, झोपेचा त्रास होईल आणि तुम्ही काय वाचले आहे ते आठवणार नाही. झोपेला कमी लेखू नका. आधुनिक आरोग्य विज्ञान झोपेला खूप महत्त्व देते. तुम्हाला आवश्यक ती झोप मिळते की नाही याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे सांगत मोदी यांनी विद्यार्थ्यांनी रिल्स पाहू नयेत असे सांगितले.