राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 29 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात या याचिकेवरील सुनावणीची संभाव्य तारीख 29 जानेवारी आहे. यापूर्वी ही तारीख 30 जानेवारी होती.

सर्वोच्च न्यायालयाने याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 31 जानेवारी ही अंतिम मुदत दिली आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांना यासाठी वेळ वाढवून हवा असल्यास ते 29 जानेवारीला न्यायालयाला विनंती करू शकतात.

आयोगाचा निर्णय राखीव

निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर ताबा कोणाचा? यासंदर्भात सुनावण्या झाल्या. दोन्ही बाजू पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले होते. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे, असा निवडणूक आयोगाचा निर्णय स्पष्ट होता.