पंजाब लुधियाना समराला येथे राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा

राष्ट्रीय चॅम्पियनशिप बॉक्स लंगडी पंजाब लुधियाना समराला येथे साई स्पोर्ट अकॅडमी कॉलेज या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा दिनांक 18 ते 20 जानेवारी 2024 रोजी बॉक्स लंगडी पंजाब असोसिएशनचे अध्यक्ष बलराज सिंग यांच्या नेतृत्वाखाली बॉक्स लंगडी राष्ट्रीय अजिंक्यपद चॅम्पियनशिप चे उद्घाटन लुधियाना मतदार संघाचे आमदार जगतार सिंग दयालपुरा यांच्या हस्ते करण्यात आले या संदर्भात माहिती देताना महाविद्यालयाचे संचालक गुरबिरसिंग शाई अकॅडमी कॉलेज चे संचालक यांनी सांगितले की या स्पर्धेत 10 ते 11 राज्यातील 22 संघ सहभागी झालेआहे त्यात पंजाब, चंदिगड, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश असे विविध राज्यातून राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेसाठी सहभागी झाले . संघटनेचे सरचिटणीस मारुती हजारे पंजाबचे सरचिटणीस गुरबिरसिंग शाही अध्यक्ष सरबजीत कौर शाही प्राचार्य रुपिंदरजीत सिंग शाही प्राचार्य राजविंदर पाल सिंग जतिंदर पाल सिंग पुष्पिंदर राजस्थानी उपाध्यक्ष राजीव मीठू भूपिंदर सिंग बिल्ला आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते 12 वर्षाखालील महाराष्ट्र राज्यातील मुलांचा संघ राष्ट्रीयस्तरीय बॉक्स लंगडीसाठीचे नेतृत्व खुशाल सचिन भाट (कर्णधार) आदित्य मलके, श्रेयस बजरंगे, अंकित माळी, शकील पाडवी जिग्नेश तडवी, प्रितेश नरगुंदे, शिवम कठाने ,आर्यन भुते ,यश कठाने, संचित जमदाळे, नैतिक गोंधळे, आभास शेलोकर, अनुराग कठाने या संघाने पंजाब च्या संघाला पराभूत करून एक आठ च्या फरकाने महाराष्ट्र संघ विजयी झाला. तदनंतर चंदीगड या संघाबरोबर फायनल खेळून एक तेराच्या फरकाने महाराष्ट्र संघ फायनलचा सामना जिंकून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुवर्णपदक घेऊन महाराष्ट्र संघ देशात पहिल्या क्रमांकाने विजयी झाला. तसेच बारा वर्षा खालील मुलींचा महाराष्ट्राचा संघ चैताली तमाईचेकर (कर्णधार) राजनंदनी हराळे ,वेदिका व्हराटे, चेतना हेमणे, अश्विनी शिंदे, तनिष्का वायफळकर, जानवी पवार, समृद्धी जाधव, शिवस्वी बांगरे, यांनी चंदीगड पंजाब हरियाणा च्या खेळाडूंना पराभूत करून महाराष्ट्र संघ लहान गटातून मुलींनी सुवर्णपदक जिंकून भारत देशात प्रथम क्रमांक मिळविला.

सीनियर मुलींच्या गटातून महाराष्ट्र राज्याने राजस्थान पंजाब चंदिगड या राज्यातील संघांना पराभूत करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आणि महाराष्ट्र राज्य हॅट्रिक करून भारत देशात पहिल्या स्थानावर राहिले सीनियर गटाचे काजल चव्हाण (कर्णधार) तेजस्विनी पवार, अंजली बजरंगे, अश्विनी शिंदे, चैताली तमायचेकर, राजनंदनी हराळे जान्हवी पवार समृद्धी जाधव, वेदिका व्हराटे, तीर्था या खेळाडूंनी चमकदार खेळ करून महाराष्ट्राचे नाव सुवर्ण अक्षरात देशपातळीवरती लौकिक केले महाराष्ट्र राज्यातून बारा वर्षाखालील मुलांचे कोच करणसिंग चव्हाण तर मॅनेजर शांताराम पाटील लहान गट मुलींचे कोच सीमा बांगरे तर मॅनेजर किशोरी नाईक, धनश्री पाटील यांनी अतिशय परिश्रम करून महाराष्ट्र राज्याचे संघ पंजाब लुधियाना येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपल्या संघाचे नेतृत्व केले नंदुरबार जिल्ह्याचे मा खासदार मीनाताई गावित मा आमदार विजयकुमारजी गावित साहेब विधान परिषदेचे माजी आमदार मा श्री चंद्रकांतजी रघुवंशी भैय्यासाहेब माजी नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी नंदुरबार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री. अमोलजी बागुल साहेब शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मा.श्री. भावेशजी सोनवणे साहेब रवी भैया, विलास भैय्या, कंजरवाडा कष्टभंजन ग्रुप, सदाराव सर, अशोक सोनार सर, राकेश तमाईचेकर, सचिन आव्हाड सर, विजू भाऊ, विनोद बाफना, संदीप भाऊ, उर्फ गोलू भैय्या,शैसव हॉस्पिटलचे डॉक्टर शहा, गजेंद्र भाऊ नंदुरबार जिल्ह्याचे बॉक्स लंगडी असोसिएशनचे उपाध्यक्ष श्रावण चव्हाण, सचिव करणसिंग चव्हाण कार्याध्यक्ष शांताराम पाटील सदस्य सचिन आव्हाड, शिरीष पवार, बालाजी सलगर,  निकुंभ, पृथ्वीराज चव्हाण नंदनगरीचे सर्व नागरिक न. प.व खाजगी प्राथमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी यांनी पंजाब येथे राष्ट्रीय बॉक्स लंगडी स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व सुवर्णपदक विजेते खेळाडूंचे, प्रशिक्षक, मॅनेजर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.