जळगाव जिल्ह्यातील घटना ! मारुतीचे दर्शन घेऊन परतत होता; रस्त्यात मृत्यूनं गाठलं; 

बोदवड – तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीचे दर्शन घेऊन परतताना तरुणाच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला. यात जळगावच्या एका युवकाचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा फाटाजवळ घडली.

नेहाल राजेश माछरे (वय १८, रा. कंजरवाडा, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात नेहाल माछरे हा आई, वडील, तीन भाऊ, एक बहिणीसह वास्तव्याला आहे. तो एका फोटो स्टुडिओत् तो कामाला होता. तसेच शिक्षणही करत होता. त्याचे वडील राजेश माछरे हे हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान त्याचा भाऊ अक्षय राजेश माछरे (वय २३) आणि त्याचे नंदुरबार येथून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र रमाईचेकर (वय १२) हे दोघेजण सोमवारी २२ जानेवारी रोजी सुट्टी असल्यामुळे बोदवड तालुक्यातील शिरसाळा मारुती मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते.

सकाळी दर्शन आटोपून परतत असताना १० वाजेच्या सुमारास मन्यारखेडा फाटाजवळ पुढील तरुणांच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी नेहाल माछरे यास वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंखे यांनी मयत घोषित केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh