ममुराबाद ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार ! गावातील लिकेज काढण्यासाठी वापरले जात आहे नित्कृष्ट व जुने पाईप

ममुराबाद -: येथील वार्ड क्रमांक तीन मध्ये पाईपलाईन लगेच झाल्याने जेसीबी बोलवून खड्डा खोदण्यात आला.बऱ्याच वर्षापुर्वी टाकलेली पाईप लाईन जुनी झाल्याने गावात पाईप लाईन लिकेजचे काम वाढत आहे. त्यामध्ये लिकेज काढण्यासाठी जेसीबीचा वापर करूण खड्डा खोलला जात आहे त्यासाठी जेसीबी वाल्याला नावाच्या सव्वा पैसे दिले जात आहे.
असाच एक प्रकार ममुराबाद येथील वार्ड क्रमांक ३ मधील मराठी शाळेच्या गेटासमोर सुरु आहे. दोन दिवसापूर्वी रस्ता कॉक्रीटीकरणाच्या कामासाठी जेसीबी बोलावण्यात आले . त्या रस्त्याची खोदाई करत असतांना तेथील पाईप लाईन लिकेज झाली. त्यासाठी तेथे जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदण्यात आला. त्याठीकाणी विस फुटाचे ३ इंची पाईप तीन नग खराब निघाले. परंतु पाईप टाकतांना ग्रामपंचायतीने नवे पाईप खरेदी करून न टाकता त्याठीकाणी वापरलेले काळेकुट्ट झालेले जुने  पाईप टाकण्यात आले. सरपंच हेमंत चौधरी तसेच ग्रामविकास अधिकारी कैलाश देसले यांना येथील ग्रामस्थांनी हा सर्व प्रकार लक्षात आणुन दिल्यानंतर देखील संबंधित ग्रामविकास अधिकारी तथा सरपंच यांनी ग्रामस्थांचे काही एक म्हणणे ऐकून न घेता जुनेच पाईप टाकून मोकळे झालेले आहेत.जेसीबीने गड्डा खोदण्यासाठी पाच तास म्हणजेच सहा हजार रुपये मजुरी तसेच लिकेज वगैरे जोडण्यासाठी गावातील मजुराला पंधराशे रुपये असे एकूण अंदाजे सात ते आठ हजार रुपये खर्च होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैसे आहेत मात्र पंचविसशे रुपयाचे नविन पाईप घ्यावयाला ग्रामपंचायतीकडे पैसे नाहीत का ? असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे.


जुने पाईप वापरून नविन पाईपांचे बिल काढले जाईल अशी शंका सुद्धा येत आहे. ममुराबाद ग्रामपंचायतीच्या अशा मनमानी व भोंगळ कारभाराबाबत जि.प तसेच पंचायत समिती येथे तक्रार करणार असल्याचे देखील येथील ग्रामस्थांनी सांगीतले

jalgaonsandesh

jalgaonsandesh