कोरपावली येथे दलीत वस्तीची कामे दलित वस्ती सोडून दुसऱ्याच ठिकाणी होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी  

प्रतिनीधी – अमीर पटेल

जळगाव – तिल्ह्यातील यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायत अंतर्गत येथे सार्वजनिक दलित वस्तीसाठी महिला शौचालय बंधकाम मंजूर करण्यात आले होते  सदरिल बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असून अध्याप सार्वजनिक महिला शौचालयाची अवस्था देखण्यासारखी राहिली नाही सन १३ मार्च २०२२ रोजी बांधण्यात आलेली शौचालय दलित वस्तीत न बांधता दहिगाव रस्त्यावर बांधन्यात आले आहे

तरी या सार्वजनिक शौचालयात बांधकामास निधि सहा लाख रुपये आले होते?

दिवा लाईट नाही पाण्याची टाकी याची व्यवस्था नाही. जाण्यासाठी रस्ता नाही. संबंधीत ठेकेदाराने दलित वस्तीत न बांधता दलित क्षेत्राबाहेर बांधण्यात आले आहे. अधिकार्यांनी या शौचालयाची पाहणी न करता ठेकेदाराने वाहत्या नाल्याजवळ बांधकाम केले आहे. तरी आज ही या सर्वजनिक महिला शौचालयात आज ही उघड्यावर शौचालय करीत आहे.

संबंधित अधिकार्यानी शौचालयातील बांधकाम नियमबाह्य आहे आणि फक्त सरकारी निधि लाटण्यासाठी ठेकेदाराने काम निकृष्ठ दर्जाचे काम केले आहे. गटविकास अधिकारी यांनी स्वता येवून पाहणी करावी अशी चर्चा नागरिक करीत आहे.