धक्कादायक ! चिमुकलीचा विनयभंग करत पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक ममुराबाद येथील घटना,

जळगाव – : तालुक्यातील ममुराबाद गावातील एका भागात राहणाऱ्या आठ वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग करत उचलून पळवून नेत असतांना तिच्या आईने संशयिताला पकडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विनयभंग करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र छन्नु कोळी रा. ममुराबाद ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

तालुका पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार, जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावातील एका भागात ३४ वर्षीय महिला आपल्या आठ वर्षाच्या मुलीसोबत वास्तव्याला आहे. सोमवारी १ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी राजेंद्र कोळी हा महिलेच्या घरी आला. त्यावेळी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग करत तिला उचलून पळवून नेत असतांना पिडीत मुलीच्या आईने त्याला पकडले. या झटापटीत त्यांनी मुलीसा सोडून पसार झाला होता. पिडीत मुलीसह तिच्या आईने जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी १ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता संशयित आरोपी राजेंद्र कोळी याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh