कुठे जन्मठेप तर कुठे 56 लाखांचा दंड; भारतापेक्षा विदेशात ‘हिट अँड रन’चे कायदे कडक…

केंद्र सरकारने हिट अँड रनचा कायदा अधिक कडक केला आहे. नवीन कायदा सर्व वाहनांना लागू होणार आहे. मग ती कार असो, दुचाकी असो किंवा ट्रक किंवा टँकर असो. नवीन कायद्यानुसार, हिट अँड रन प्रकरणात चालकाला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5-7 लाखांचा दंड ठोठावला जाईल.

याविरोधात देशभरात ट्रक चालक सोमवारपासून संपावर गेले आहेत. दरम्यान, आता जगातील अनेक देशांमध्ये हिट अँड रन प्रकरणात भारतापेक्षाही कडक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

UAE: 56 लाखांचा दंड अन्…

संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये अशा घटनांमध्ये कठोर कारवाई केली जाते. येथे, हिट अँड रनच्या बाबतीत कायदा म्हणतो की, चालकाने सर्वप्रथम वाहनाशी संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द केली पाहिजेत. घटनास्थळी पोलिस नसतील तर घटना घडल्यापासून 24 तासांच्या आत घटनेची माहिती पोलिस ठाण्यात द्यावी लागेल. माहिती उशिरा दिल्यास त्याचे कारणही स्पष्ट करावे लागेल. या घटनेत कोणी जखमी झाले किंवा मरण पावले तर पोलीस चालकाला अटक करतील. दोषी सिद्ध झाल्यास त्याला तुरुंगवास किंवा 25 हजार दिरहम, म्हणजेच 56 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड होऊ शकतो. मद्य सेवनाची पुष्टी झाल्यास दंड आणखी वाढवला जाऊ शकतो.

सौदी अरेबिया: 4 वर्षे तुरुंगवास किंवा 44 लाख रुपये दंड

सौदी अरेबियात अपघातातमृत्यू झाल्यास चालकाला चार वर्षांचा तुरुंगवास किंवा 44,44,353 रुपये दंड आकारला जातो. सौदी अरेबियाच्या ट्रॅफिक रेग्युलेशनमध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्या अपघातामुळे कोणी जखमी झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तर दोषी ड्रायव्हरला 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 22,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल.

कॅनडा: जखमी झाल्यास 5 वर्षे आणि मृत्यू झाल्यास जन्मठेप

कॅनडाच्या कायद्यानुसार, अशा प्रकरणात कोणी जखमी झाल्यास दोषी चालकाला 5 वर्षांची शिक्षा होईल. अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास दोषी चालकाला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल.

अमेरिका: दंडासह 10 वर्षे तुरुंगवास

अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये याबाबत वेगवेगळे नियम आहेत. बहुतांश राज्यांमध्ये, अशा प्रकरणांमध्ये ड्रायव्हरची चुकी आढळल्यास त्याला दंडासह 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

ब्रिटन: 6 महिने तुरुंगवास आणि अमर्यादित दंड

ब्रिटनमध्ये अपघात झाल्यानंतर चालक घटनास्थळी उपस्थित आहे की, पळून गेला, यावर शिक्षा ठरलेली असते. आरोपीकडून अमर्यादित दंड वसूल केला जाऊ शकतो. याशिवाय 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार 5 ते 10 पेनल्टी पॉइंट्स ठरवले जातात. यावर अवलंबून शिक्षा कमी-अधिक असू शकते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं