भुसावळ पोलीसावर चाकू हल्ला करणाऱ्या संशयीत तरुणाची आत्महत्या?

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – येथील गडकरी नगरा जवळील शिवदत्त नगर मध्ये राहणाऱ्या सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी व्यकैंया मैलूल आपल्या पत्नी व मुलगा सुनील सह राहतात मात्र पिता पुत्र यांच्यात वाद झाल्याने पित्याने ११२ नंबर वर मदत मागितली असता भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी अक्षय चव्हाण हे मदतीसाठी धावून गेले. आणि दोघांना समजविले मात्र तेवढ्यात सुनिल मैलेलू या मुलाने स्वयंपाक घरात असलेल्या चाकूने थेट पोलीसावर चाकू हल्ला करून जखमी केले व घटना स्थळावरुन फरार झाला.

पोलीस हल्लेखोराचा शोध घेत घेत असताना संशयीत हल्ले खोराने रेल्वे खाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh