सचिनच्या बाळाची आई होणार सीमा हैदर, पाचव्या बाळाला देणार जन्म

पबजी खेळत असताना झालेल्या ऑनलाइन प्रेमाकरीता देशाची सीमा ओलांडून हिंदुस्थानातील नोएडामध्ये आलेली सीमा हैदर नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या हिंदुस्थानातील वास्तव्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर कधी तिने स्वत: प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन प्रसिद्धी मिळवली. आता पुन्हा एकदा सीमाने ती गरोदर असल्याचा दावा केला आहे.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीमाने आपण आई होणार असल्याचे सांगितले आहे. एका मुलाखतीत 2024 मध्ये लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे. सचिन आणि त्याच्या कुटुंबियांसमोर प्रसारमाध्यमांशी बोलताना सीमाने गरोदर असल्याचे सांगितले आहे. यावेळी सचिनच्या वडिलांनी सीमाचा हात पाहून तिला मुलगा होणार असल्याचे म्हटले. त्यांच्या वक्तव्याला सीमानेही दुजोरा दिला.

पत्रकाराने प्रसुतीच्या संभाव्य तारखेबद्दल विचारणा केली असता, सीमाने त्यांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले. यावर पत्रकाराने पुन्हा गोड बातमी आधी मिळणार की नंतर असे विचारले असता, सीमाने होळीच्या आधी नाही पण लवकरच आनंदाची बातमी ऐकायला मिळले असे म्हटले.

सीमाने पाकिस्ताहून हिंदुस्थानात येत असताना आपल्या समवेत स्वत: च्या मुलांनाही आणले होते. सीमाला पूर्वाश्रमीच्या पतीपासून चार मुले आहेत. हिंदुस्थानात आल्यानंतर तिने मुलांची नावे देखील बदलली आहेत.