सुनसगावात विकसित संकल्प रथ यात्रेत विविध योजनांची माहिती !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे नुकतेच भारत सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी मोदी सरकार च्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात त्या बाबत माहिती विकसित संकल्प यात्रेच्या निमित्ताने ग्रामस्थांना माहिती देण्यात आली यावेळी बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर याच योजनांच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या योजना विषयी माहिती ग्रामस्थांना देण्यात आली या रथ यात्रेचे सारथ्य पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान यांनी केले. यावेळी व्हिडिओ चित्रीकरण माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारे अनेक योजना दाखविण्यात आल्या त्यात बचतगटाच्या माध्यमातून वर्धीनी व सीआरपी आणि ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उम्मेद या योजनेचा फायदा व बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण काळाची गरज असल्याचे सांगितले तर आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयुष्यमान भारत तसेच महिलांना मिळणारे लाभ या बाबत माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच व ग्रामसेविका यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन भाजपाचे जिल्हा सचिव भालचंद्र पाटील यांनी केले. या कार्यक्रमा प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा एक गट जरा या कार्यक्रमाच्या लांबच राहिला. भारत सरकार की मोदी सरकार या बाबत चर्चा ऐकण्यास मिळाली मात्र कोणाचे काहीही असो बचतगटाच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

यावेळी लाभार्थी महिलांनी सुंदर अशा प्रकारे आपले अनुभव कथन केले परंतु सर्व पदाधिकारी बोलताना दिसले. येथील भाजपाचे पदाधिकारी फक्त फोटो काढण्यासाठी समोर आले सर्व जबाबदारी मात्र भालचंद्र पाटील यांनी पार पाडली दोन तीन ग्रामपंचायत सदस्य सोडले तर कोणीही ग्रामपंचायत सदस्य पुढे येताना दिसत नव्हते मात्र महिलांमध्ये मोठा उत्साह यावेळी पाहायला मिळाला. विकसित संकल्प रथ यात्रेत जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित असते तर कार्यक्रमाची शोभा वाढली असती असे बोलले जात होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh