जळगाव जिल्ह्यात जेएन- १ चे दोन रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्ट

जळगाव – कोरोनाच्या नवा व्हेरिएट ‘जेएन १’ राज्यात पाय पसरत आहे. राज्यातील सांगली, बीड जिल्ह्यात रुग्ण आढळून आल्यानंतर (Jalgaon) जळगाव जिल्ह्यात देखील दोन रुग्ण आढळून आले आहेत. (Corona New Veriant) भुसावळ व जळगावमध्ये एक- एक रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या प्रकारातील ‘जेएन १’ या नव्या व्हेरिएटचा भुसावळमध्ये एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे. त्यावर उपचार करून घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तो अयोध्या येथे गेला असता तेथून (Jalgaon Corona Update) परतल्यानंतर त्याला न्युमोनिया होवून श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता तो पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जळगावातील रुग्ण रुग्णालयात

जळगाव जिल्ह्यात आढळून आलेला दुसरा रूग्ण हा जळगाव शहरातील आहे. त्याच्यवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिलहा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. मात्र कोरोनोच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. शिवाय जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय सज्ज आहे.