दिव्यांगांसाठी ‘हे’ शब्द वापरता येणार नाहीत, ECI ने जारी केली गाई़डलाईन… 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना सार्वजनिक भाषणांमध्ये दिव्यांगांसाठी वापरल्या जाणार्‍या शब्दांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

आयोगाने कठोर भूमिका घेत सर्व पक्षांना ‘अपमानास्पद शब्द’ वापरू नयेत, असे निर्देश दिले आहेत. तसंच राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाइट, सोशल मीडिया, भाषणात दिव्यांगांबाबत आदरार्थि शब्द वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पक्षांनी मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यास त्यांना अपंग व्यक्तींचे हक्क कायदा, 2016 च्या कलम 92 अंतर्गत 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असंही निवडणूक आयोगने स्पष्ट केलं आहे.

राजकीय पक्षांनी किंवा नेत्यांनी आपल्या भाषणात मुका, मतिमंद, वेडा, सरफिरा, आंधळा, काना, बहिरा, लंगडा, अशक्त, अपंग इत्यादी शब्दांचा वापर करु नये असं कठोर शब्दात सुनावलं आहे.. अशा शब्दांचा वापर केल्यास तो अपंगांचा अपमान असा अर्थ लावला जाऊ शकतो.

राजकीय पक्षांना सार्वजनिक भाषणे, मोहिमा आणि इतर उपक्रम अपंग व्यक्तींना उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या वेबसाइट आणि सोशल मीडियावर दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असंही सांगण्यात आलं आहे.

कार्यकर्त्यांना दिव्यांगांचं प्रशिक्षण मॉड्युल देण्याच्या सूचना

सूचना

राजकीय पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिव्यांगांचं प्रशिक्षण मॉड्युल द्यावे, असे निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तसेच पक्षाचे कार्यकर्ते आणि सदस्य म्हणून दिव्यांगांचा अधिकाधिक सहभाग करुन घ्यावा. दिव्यांगांसाठी असलेल्या हक्क अधिनियम, 2016 नुसार, अंधत्व, कमी दृष्टी, बहिरेपणा, अपंगत्व, बौद्धिक अपंगत्व अशी दिव्यांगांची वाख्या आहे.

दिव्यांगांचा आदर वाढवण्यासाठी पावलं

दिव्यांगांबद्दल ‘समावेशकता आणि आदर वाढवण्याच्या’ उद्देशाने ECI ने हे पाऊल उचलले आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींना मानवी अपंगत्वाच्या संदर्भात अपमानास्पद किंवा रूढीवादी’ शब्द वापरू नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्तींचा उल्लेख करताना राजकीय पक्ष केवळ अधिकार-आधारित शब्दावली वापरू शकतात.

निवडणूक आयोगाने असंही स्पष्ट केलं आहे की प्रचार सामग्रीमध्ये सक्षम किंवा भेदभाव करणारी भाषा वापरली जाणार नाही याची खात्री करण्यासाठी अंतर्गत पुनरावलोकन करावे लागेल. सर्व पक्ष या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतील आणि अपंग व्यक्तींच्या मानवी समानता, सहभाग, प्रतिष्ठा आणि स्वायत्ततेचा आदर करतील.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला