प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव – वराडसिम रस्त्यावर पाटचारी जवळ एक नर जातीचे रोही (निलगाय) जखमी अवस्थेत पडलेले असल्याची माहिती वनविभागाचे कर्मचारी चौधरी यांनी वराडसिम येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र डामरे व परिचर चंद्रकांत कोळी यांना दिली असता यांनी गावातील सहकारी सोबत घेतले. आणि ठिकाणावर जाऊन जखमी झालेल्या रोही या प्राण्यावर उपचार केले.
या प्राण्यावर कदाचित कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला यावेळी गावातील भुषण वाणी, काशिनाथ वाणी, चेतन कवठे, वायकोळे या ग्रामस्थांनी तसेच शेतकऱ्यांनी उपचार करण्यासाठी मदत केल्याचे सांगितले आहे.