यावल शहरात हिवताप , खोकळा आणी डेंग्युसदृष्य रुग्णांच्या संख्ये प्रचंड वाढ होत असुन नगर परिषद प्रशासन जागृत व सर्तक राहावे..

दिपक नेवे

 

कोरोना संसर्गाचा जिवघेणा गोंधळ अद्याप संपलेला नसतांना शहरात व परिसरात मागील काही दिवसांपासुन हिवताप , खोकळा , डेंग्युसदृष्यच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असुन, यावलच्या ग्रामीण रुग्णालयात ओपीडी संख्या मोठया प्रमाणात वाढत असुन यात लहान मुलांचा मोठा सहभाग दिसुन येत आहे, ग्रामीण रुग्णालयापासुन तर खाजगी दवाखान्यात रुग्णांची प्रचंड गर्दी दिसुन येत आहे . दरम्यान यावल शहर व परिसरासह तालुक्यात सर्वत्र डेंग्युच्या सदृष्य आजाराने थैमान घातले असुन , दिवसंदिवस या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढत असुन , यावल नगर परिषदच्या वतीने तात्काळ युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविणे , नागरीकांमध्ये आरोग्याविषयी दवंडी व्दारे जनजागृती करणे , महीन्यातुन किमान दोन वेळा जंतुनाशक धुर फवारणी करणे , शहरात रुग्णांची झपाट्याने वाढ होत असुन , आरोग्य विभागाच्या माध्यमातुन घरोघरी जावुन प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करणे त्याचबरोबर शहरातीत काही प्रभागामध्ये वरहांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढली असुन ती तात्काळ कमी करावी अशा विविध नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्नावर तात्काळ यावल नगर परिषदने लक्ष केन्द्रीत करावे अशी मागणी नागरीकांकड्डन होत आहे . दरम्यान डेंग्यु सदृष्यरुग्ण तसेच हिवताप व खोकला अशा साथीच्या आजारात वाढ होतांना दिसत असुन यावल तालुक्याचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ . फिरोज तडवी यांनी नागरीकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन आवाहन केले आहे.