आ.निलेश लंके धावले मदतीला ! अंगणवाडी सेविकांना २५ हजार तर मदतनीसांना २० हजार रुपये मानधन देण्याची अधिवेशनात मागणी

लक्षवेधी मांडताना आमदार निलेश लंके म्हणाले, राज्यातील हजारो अंगणवाडी सेविकांच्या व‌ मदतीसांचे प्रश्न प्रलंबित असून संप पुकारला आहे. तसेच अनेक शासकीय कामांवर व याद्या तयार करण्यावरही संघटनेच्या वतीने त्यांनी बहिष्कार टाकला आहे.

या संदर्भात अनेक वेळा लेखी व तोंडी निवेदने दिली, मोर्चा, आंदोलने काढून त्यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे. अंगणवाडी सेविकांना मिळणारा मोबदला हा वेतनच आहे.

त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून त्यांना वेतनश्रेणी व ग्रॅच्युइटी व इतर भत्ते, भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा व इतर लाभ देण्याची लक्षवेधी आमदार निलेश लंके यांनी केली.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आ. लंके यांची घेतली होती भेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सन्मानजनक वेतनवाढ तसेच दरमहा पेन्शन सुरू करण्यात यावी यासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी पारनेर येथे आ. नीलेश लंके यांची भेट घेऊन विधानसभेत आवाज उठविण्यासाठी साकडे घातले होते.

या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात आंदोलने सुरू आहेत. आ. नीलेश लंके यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा असे या कर्मचाऱ्यांनी यावेळी साकडे घातले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आ. नीलेश लंके यांनी सांगितले की, अंगणवाडीत काम करणाऱ्या माझ्या माता भगिनींचे प्रश्‍न मला ज्ञात आहेत. तुटपुंंज्या मानधनामध्ये त्यांचा चरितार्थ चालू शकत नाही

याचीही आपणास जाणीव आहे. यापूर्वीही आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावर विधानसभेत आवाज उठविला असून त्यांच्या रास्त मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशी आग्रही मागणी केली असल्याचे सांगितले.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh