ममुराबाद येथे संगीतमय भागवत कथा सप्ताहाचे आयोजन.

महेंद्र सोनवणे

जळगाव – : तालुक्यातील ममुराबाद येथे दिनांक २१ डिसेंबर पासुन दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.

सालाबादाप्रमाणे यंदाही श्री गुरु मोठे बाबा यांच्या आशीर्वादाने ग्रामस्थ मंडळी यांच्या बहुमोल सहकार्याने भजनी मंडळ व सप्ताह समिती कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी योग्य महोत्सवीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आयोजित केलेला आहे.मठाधिपती गोविंद महाराज चौधरी वरसाळेकर नामवंत किर्तनकार यांचे हरिकिर्तन तथा श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दि. २१ पासून सुरू होत असलेल्या या संकिर्तन सप्ताहाची दैनंदिन अशी आहे.

सकाळी ५ ते ६ काकळ आरती, सकाळी ९ ते ११ किर्तन, दुपारी २ ते ५ श्री ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ः ३० ते १० : ३० किर्तन असा कार्यक्रम यात होणार आहे.

या किर्तन सप्ताह दरम्यान दिनांक २१ गुरुवार रोजी सकाळी ९ वाजता ह भ प श्री पांडुरंग महाराज सपकाळे, (आवारकर ) तर रात्री ८:३० वाजता हभ प श्री गाथामुर्ती उमेश महाराज ( दशरथे ) श्रीक्षेत्र आळंदी देवाची.

दिनांक २२ रोज शुक्रवार सकाळी ९ वाजता ह.भ.प श्री सारंगधर महाराज पाटील, श्री संत मुक्ताई संस्थान, श्रीक्षेत्र मेहूण,

रात्री ८:३० वाजता ह.भ.प श्री सोपान महाराज शास्री सानप, (हिंगोली )

दिनांक २३ रोज शनिवार सकाळी ९ वाजता ह.भ.प श्री भरत महाराज पाटील, श्रीक्षेत्र बेळी संस्थान,

रात्री ८:३० वाजता ह.भ.प श्री महंत समाधान महाराज ( भोजेकर ) ह मु जळगाव,

दिनांक २४ रोज रविवार सकाळी ९ वाजता ह.भ.प श्री धर्मभुषण ज्ञानेश्वर महाराज पाटील (जळकेकर )

रात्री ८:३० वाजता ह.भ.प श्री पुरुषोत्तम महाराज पाटील, आवाजाचे जादुगार ( बुलढाणा )

दिनांक २५ रोज सोमवार सकाळी ९ वाजता ह.भ.प श्री भागवताचार्य जनार्दन महाराज (आरावेकर )

रात्री ८:३० वाजता ह.भ.प श्री पांडुरंग महाराज घुले, अध्यक्ष – गाथा मंदिर श्रीक्षेत्र देहू.

दिनांक २६ रोज मंगळवार सकाळी ९ वाजता ह.भ.प श्री गोप्रेमी गजानन महाराज वरसाळेकर, अध्यक्ष श्रीगुरु मोठेबाबा सेवा ट्रस्ट, जळगाव.

रात्री ८:३० वाजता ह.भ.प श्री गुरुवर्य उल्हास महाराज सुर्यवंशी, अध्यापक वा. शि. संस्था. आळंदी देवाची.

दिनांक २७ रोज बुधवार सकाळी ९ वाजता ह.भ.प श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता,

संध्याकाळी ६ ते ८ वाजता ह.भ.प श्री धर्मभुषण, धर्माचारी निवृत्ती महाराज देशमुख, ( इंदोरीकर )

तसेच दिनांक २७ रोज गुरुवार सकाळी ९ वाजता ह.भ.प श्री मठाधिपती ह.भ.प गोविंद महाराज चौधरी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.

तरी परीसरातील भावीकांनी या संकिर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh