जालना – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. या डेडलाईनला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली आहे.
या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा सुरू आहे.
जरांगे पाटलांनी बैठकीत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
1 नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या
2 नोंद सापडली पण त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या घरी जाऊन सांगा
3 नोंदीच्या आधारावर कुटुंबाला आरक्षणात घ्या
4 सर्व नातेवाईक सुद्धा आरक्षणात घेतले पाहिजे
5 रक्ताच्या सर्व नातेवाईकांना आरक्षण दिले पाहिजे
6 शिंदे समितीचे काम सतत सुरू ठेवले पाहिजे
7 ज्या विद्यार्थ्यांनी राज्यभर सारथी, ईडब्लूएस मार्फत शिक्षण घेतले, किमान 13 हजार पेक्षा अधिक निवडी झाल्यात पण नेमणूक नाही, तातडीनं त्यांना नियुक्ती द्यावी.
8 मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारला विनंती, तोपर्यंत जर तुम्हाला नोकरभरती करायची असेल तर करा, आमची हरकत नाही पण मराठ्यांच्या जागा रिक्त ठेवून पदं भरा.
9 सरकारला पुन्हा विनंती सरकारने नोंदी शोधाव्यात, त्यासाठी भाट लोकांकडे असलेल्या वंशावळी तापसाव्यात, देवीची लस दिली त्यावेळेच्या पण नोंदी आहेत, त्या सुद्धा ग्राह्य धराव्यात.
10) नोंदी सापडल्यानंतर लगेच प्रमाणपत्र द्या, काही ठिकाणी कक्ष बंद पडले आहेत ते पुन्हा सुरू करा.