जळगावातील शिवमहापुराण येथून बेपत्ता विवाहिता सापडली

जळगाव – शहरात वडनगरी येथे झालेल्या महाशिवपुराण कथा येथून जामनेर येथील विवाहिता बेपत्ता झाली होती. या महिलेचा अखेर ५ दिवसानंतर शोध लागला असून हि विवाहिता गुजरातमधील अहमदाबाद येथील रेल्वे स्टेशन परिसरात विवाहिता गुंगीत असलेल्या अवस्थेत आढळून आली. स्थानिक पोलीस व नातेवाईकांच्या मदतीने विवाहितेला शनिवारी जामनेरात आणण्यात येणार आहे.

प्रीती अमोल चौधरी (वय २४, रा. जामनेर) असे विवाहितेचे नाव आहे. ती पतीसह जामनेर येथे राहते. प्रीती चौधरी ह्या शिवपुराण कथा ऐकण्यासाठी वडनगरी येथे जाऊन येते म्हणून गेल्या होत्या. मात्र तेथून त्या परतल्याच नाही, म्हणून पतीने पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार दिली होती. तर दुसरीकडे नातेवाईकांनी देखील विवाहिता बेपत्ता झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गुजरातमधील अहमदाबाद येथील रेल्वे स्टेशन परिसरात तेथील पोलिसांना हि विवाहिता गुंगीत असलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी बेपत्ता महिलांच्या फोटोंवरून महिलेची ओळख पटवली. त्यांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. तसेच, विवाहितेच्या नातेवाईकांनी देखील ओळख पटवली. गांधीनगर येथे महिलेचा भाऊ राहतो. त्यानेही अहमदाबाद येऊन ओळख पटवली आहे. शनिवारी सकाळी विवाहितेला जामनेर येथे आणण्यात येणार आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh