काँग्रेसच्या पाच खासदारांचं निलंबन, लोकसभेच्या सुरक्षा उल्लंघनाच्या वादात ‘अयोग्य वर्तन’ केल्याचा ठपका

नवी दिल्ली – लोकसभेत झालेल्या सुरक्षा भंगावर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेत विरोधकांनी आवाज उठवला. यानंतर ‘अयोग्य वर्तन’ केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या पाच खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित खासदारांमध्ये डीन कुरियाकोसे, हिबी इडन, जोथिमनी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांचा समावेश आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्यसभेतून निलंबित केल्यानंतर पाच काँग्रेस खासदारांच्या निलंबनाने विरोधी सदस्यांविरुद्ध केलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या यादीत भर पडली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh