मराठा आरक्षणातच्या विषयात गौतमी पाटीलची एन्ट्री! म्हणाली, “मला आरक्षण…”

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील ही कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. यातच आता तिने मराठा आरक्षणाच्या मुद्यातही उडी घेतली आहे. मला आरक्षण हवं आहे, असे तिने म्हटले आहे.

गौतमी पाटीलने बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून यावरुन राजकारण तापले आहे. यातच आता मराठा आरक्षण प्रश्नात गौतमी पाटीलचीही एन्ट्री झाली आहे. येत्या १५ डिसेंबर रोजी गौतमी पाटीलचा ‘घुंगरू’ हा पहिला चित्रपट येणार आहे. त्यानिमित्ताने तिने पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिला आरक्षणाबद्दल विचारले असता मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे असे तिने म्हटले आहे. साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळालेच पाहिजे, असेही तिने म्हटले आहे.

 

ताजा खबरें