एसटीच्या तिकीटाचं पेमेंट आता बसमध्येच UPI द्वारेही करता येणार!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्वच प्रमुख आगारांमधील बसेसमध्ये UPI द्वारे पैसे देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात सुरुवात केली आहे. आजपर्यंत रोख पैसे देण्याचा किंवा आधीच तिकीट ऑनलाइन बुक करणे असे दोनच पर्याय होते.

२५ ऑगस्ट २०२२ पासून याची काही स्थानकांममधील ठराविक बसेसमध्येच चाचणी सुरू होती मात्र आता जवळपास सर्व प्रमुख स्थानाकांमधील बसेसमधी ही सोय उपलब्ध होत आहे!

मात्र आता बसमध्येच वाहकांना ETI मशीन्स देण्यात आल्या असून याद्वारे आपण मशीनवरील QR स्कॅन करून आपल्या फोनमधील फोनपे, गूगल पे, Paytm UPI अशा कोणत्याही UPI ॲपमार्फत स्कॅन करून लगेच ऑनलाइन पैसे देऊन पेमेंट पूर्ण करू शकता! यामुळे लवकरच सर्व एसटी बसमध्येही कॅशलेस (रोख पैसे जवळ न ठेवता) प्रवास करता येईल!

ही सेवा आत्ता हळूहळू उपलब्ध करून देण्यात असल्यामुळे काही ठिकाणी हे मशीन उपलब्ध नसल्याने हा नवा पर्याय कदाचित मिळणार नाही असं होऊ शकतं. प्रवास करताना तो विचार करूनच सध्यातरी प्रवास करा. येत्या काही दिवसात/महिन्यात सर्वच बसेसमध्ये हे नक्की उपलब्ध होईल!

MSRTC च्या एसटी बसमधून प्रवास करताना UPI द्वारे कसे पैसे द्यायचे ?

कंडक्टर/वाहक आपल्याकडे आल्यावर कोणत्या ठिकाणी उतरायचं आहे आणि किती प्रवासी एकत्र आहोत ते सांगा.

त्यानुसार वाहक तुम्हाला तुमच्या तिकीटाची एकूण रक्कम सांगतील.

त्यांना तुम्ही UPI द्वारे पैसे देणार आहात असे सांगा.

मग ते तुम्हाला त्यांच्याकडील मशीन मध्ये ती रक्कम टाकून त्याचा QR कोड तयार करून तुम्हाला दाखवतील.

तुम्ही वापरत असलेल्या UPI ॲप मध्ये जाऊन Scan QR चा पर्याय निवडा आणि तो कोड स्कॅन करा.

आता रक्कम योग्य असल्याची खात्री करून पिन टाकून पेमेंट करा.

पेमेंट यशस्वी झालं असेल तर तुम्हाला मेसेज येईल आणि वाहक तुम्हाला तिकीट देतील.

तिकीटावर नेहमीच्या माहितीसोबत तुम्ही UPI मार्फत पैसे दिले असा उल्लेख असेल.

आता एसटीचं तिकीट बुक करण्यासाठी खालील पर्याय आहेत :

एसटी बसमध्येच : एसटी बसमध्येच कंडक्टर/वाहकांकडून ऐनवेळी तिकीट घेऊन त्याचे पैसे रोख किंवा आता UPI मार्फत फोनद्वारेही देता येतील.

महामंडळाच्या अधिकृत द्वारे : MSRTC Mobile Reservation App on Google Play

महामंडळाच्या वेबसाइटद्वारे : https://public.msrtcors.com/ticket_booking/index.php या लिंकवर जाऊन अकाऊंट रजिस्टर करून तिकीट बुक करत UPI/Debit Card/Credit Card/Wallet असे बरेच ऑनलाइन पर्याय वापरुन पैसे देता येतील. याद्वारे बुकिंग केल्यावर त्याची प्रिंट काढून किंवा याचा आलेला ईमेल कंडक्टरना दाखवून प्रवास करू शकता.

Redbus/Abhibus/MakeMyTrip/GoIbibo/Paytm असे बाहेरचे पर्याय वापरुनसुद्धा तिकीट बुकिंग करता येतं! बुकिंग पूर्ण झाल्यावर याचा आलेला ईमेल कंडक्टरना दाखवून प्रवास करू शकता.

jalgaonsandesh

jalgaonsandesh