गोंभी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोंभी येथे दि.६ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात करण्यात आले होते आणि गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली तसेच गावातील पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशाच प्रकारचे जयंती आणि पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना माहिती मिळत राहावी असे सांगण्यात आले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh