सुनसगाव ग्रामपंचायतीची पहिली मासिक सभा ८ डिसेंबर रोजी होणार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायत कार्यालयावर गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासक होते आता नुकतीच ग्रामपंचायत निवडणुक होऊन जनतेने मतदान करुन आपले प्रतिनिधी दिले आणि दि.३० नोव्हेंबर रोजी अनेक नाट्यमय घटना घडल्या आणि अखेर नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य यांनी पदभार स्वीकारला असून दि. ८ डिसेंबर रोजी पहिली मासिक सभा होत आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थांना उत्सुकता लागली असून पदावर बसण्या अगोदर अनेक कामे या पदाधिकाऱ्यांनी केली त्यामुळे नक्किच गाव विकासासाठी प्रयत्न ही कार्यकारिणी करेलच असा विश्वास ग्रामस्थांना असला तरी पहिल्या मासिक सभेत सफाई कर्मचारी नेमणूक करणे, गटारी साफ सफाई करण्याचे काम सुरू करणे, ठिकठिकाणी गोंभी आणि सुनसगाव येथे ढापे तयार करणे, पुरुष व महिला शौचालयाची आतून साफसफाई करणे, लाईट बसविणे, बसस्थानक परिसरात जे गटारीचे पाणी वाहून येते त्या ठिकाणी गटार बांधकाम करणे, कोंडवाडा साफसफाई करणे अशा प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता असून या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये कोणता पदाधिकारी आपल्या वार्डात विकास कामे खेचून आणतो याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. गोंभी आणि सुनसगाव येथील सर्वच ग्रामस्थांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच सर्व योजना गरजूंना मिळाव्यात आणि गावाचा विकास व्हावा असे पत्रकार जितेंद्र काटे यांनी सरपंच व ग्रामसेविका यांचा सत्कार करताना सांगितले असून सरपंच काजल भोजराज कोळी यांनी कोणताही ग्रामस्थ शासकीय योजना पासून वंचित राहणार नाही तसेच जास्तीत जास्त कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh