ममुराबाद येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन !

जळगाव – : तालुक्यातील मुमराबाद येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच हेमंत चौधरी, ग्रा.पं. सदस्य अमर पाटील, गोपाल मोरे, शैलेंद्र पाटील, गावातील ग्रामस्थ सचिन पाटील, किरण पाटील, दत्तु सोनवणे, शांताराम पाटील, महेंद्र दिलीप सोनवणे, भगवान सोनवणे, भानुदास सोनवणे, राजू सोनवणे, रोहित सोनवणे, दिलीप सोनवणे, आदी उपस्थित होते. सरपंच हेमंत चौधरी यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन तसेच पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या पुतळ्यालामल्हार पण करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ त्याचप्रमाणे बौध्द उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh