जळगाव – गेल्या काही महिन्यांपासुनप्र दिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेची जळगावात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या दि. ५ डिसेंबर पासुन वडनगरी येथे त्यांची कथा सुरु होणार आहे. यासाठी आज दि.४ रोजी प्रदिप मिश्रा यांचे जळगाव येथे सायंकाळी आगमन होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे शिवमहापुराण कथाकार प्रदिप मिश्रा यांची कथा निश्चित करण्यात आली आहे. या कथेची अनेक दिवसांपासुन उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या आठवड्यापासुन जिल्हाभरात अवकाळी पाऊस असल्यामुळे ही कथा रद्द होणार
की काय असा कयास लावला जात होता. मात्र प्रदिप मिश्रा यांची कथा दि. ५ ते ११ या दरम्यान निश्चित झाली असून आज प्रदिप मिश्रा सायंकाळी ३ ते ५ वाजेदरम्यान जळगाव रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहेत. आयोजकांकडून ते रेल्वेने येणार असल्याने सांगण्यात आले आहे.
त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून शिवाजीनगर पासुन वडनगरी फाटा पर्यंत स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. यादरम्यान ठिकठिकाणी त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात येणार असून हजारो भाविक या स्वागत यात्रेत उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.