भारत – ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना प्रो पाकिस्तान घोषणाबाजी; बंगळुरातून दोन जणांना अटक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी 20 सामना हा आज बंगळुरात होणार आहे. त्यापूर्वीच बंगळुरू पोलिसांनी दोन भारतीय व्यक्तींना चौथ्या टी 20 सामन्यावेळी प्रो पाकिस्तान घोषणाबाजी करणाऱ्या दोन भारतीय व्यक्तींना अटक केली आहे.

नुकत्याच झालेल्या वनडे वर्ल्डकपदरम्यान देखील पाकिस्तानी चाहत्यांना पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यापासून रोखण्यात आलं होतं.

बंगळुरूच्या न्यू गुराप्पना पालया भागात राहणाऱ्या इनायत आणि सईद मुबारक यांना अटक झाली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी बंगळुरातील पबमध्ये प्रो पाकिस्तान घोषणाबाजी केली. मोकाहॉलिक पबमध्ये हे दोन्ही आरोपी सामना पाहत होते.

दरम्यान, भारत – ऑस्ट्रेलिया सामना पाहत असताना रात्री 10.30 च्या दरम्यान पब मॅनेजर सुधीर सिंह यांनी सामना सुरू असताना भारत माता की जय अशी घोषणा दिली. त्यानंतर सईद मुबारक आणि त्यांच्या मित्राना पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिली असा दावा केला जात आहे.

या घटनेनंतर सुधीर सिंह आणि या आरोपींमध्ये वाद झाला. पबने पाकिस्तान झिंदाबादचे स्लोगन चालणार नाहीत असं सांगितलं. त्यानंतर मॅनेजरने पोलिसांना बोलंवलं. दरम्यान, पोलिसांनी इनायत आणि सईद यांना पकडलं तर दोन मित्र पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडण्यात आलेल्या दोन आरोपींना जेपी नगर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं.

jalgaonsandesh

jalgaonsandesh