हा Video पाहून अंगावर येईल काटा! शिवरायांचा पुतळा अन् ते मुस्लीम जोडपं …

छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द ऐकले तरी प्रत्येक मराठी माणसाचा उर अभिमानाने भरुन येतो. महाराष्ट्राची ओळख सांगताना ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जातं अशा छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

सध्या अशाच एका व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मुस्लीम दांपत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याला अभिवादन करताना दिसत आहे. आधी हा तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक करताना दिसतो. त्यानंतर पुतळा पुसून झाल्यावर हा तरुण पुतळ्याला एक मोठा हार घालतो. नंतर हा तरुण पुतळ्याची आरती करतो. या तरुणाबरोबर असलेली बुरख्यातील महिला महाजारांच्या पुतळ्याला ओवाळते. हा व्हिडीओ नेमका कुठे शूट करण्यात आला हे हे ठाऊक नसलं तरी तो चर्चेत आहे हे मात्र नक्की.

अनेकांनी केलं या दोघांचं कौतुक

हा पुतळा एखाद्या ग्रामीण भागामधील असल्यासारखं आजूबाजूच्या परिसरावरुन दिसत आहे. या 24 सेकंदांच्या व्हिडीओच्या शेवटी काही स्थानिक रहिवाशी शिवरायांच्या पुतळ्यासमोर उभे असल्याचा फोटोही दिसत आहे. व्हिडीओला 22 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करुन या दोघांचं कौतुक केलं आहे. ‘हा आहे माझा खरा महाराष्ट्र’, ‘आपण पाहिले मराठी आहोत. शिवरायांचे मावळे आहोत. धर्म ही आपली खाजगी बाब आहे’, ‘गहिवरून आले यार, तुम्हाला पूर्ण आयुष्य सुख समृध्दी व आनंदाचे जाओ हीच ईश्वचरणी प्रार्थना जय महाराष्ट्र,’ अशा कमेंट्स अनेकांनी केलेल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये कार्यकरत असलेले तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कामांमध्ये सक्रीयपणे सहभागी असलेल्या अरबाज शेख मोकाशी यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे.

नेमका व्हिडीओ कुठला?

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. हे महाजारांची मनोभावे उपासना करणारे कोण आहेत याची माहिती मिळालेली नाही. तुम्हाला यासंदर्भात काही माहिती असेल तर कमेंट करुन नक्की कळवा. व्हिडीओ शेअर करणारे अरबाज शेख मोकाशी हे साताऱ्यामधील असल्याने हा व्हिडीओ तिथलाच कुठला तरी असावा असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मात्र याबद्दलची ठोस माहिती मिळू शकलेली नाही.