अमळनेरचे समाधान कंखरे सर “शिक्षक भूषण पुरस्कार” व शिवाजीराव मोहन पाटील यांना “समाज भुषण पुरस्कार”प्रदान !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – श्री पांडुरंगाच्या पावन भूमी पंढरपूर येथे अमळनेर ईगल न्यूज नेटवर्क चॅनल च्या वर्धापन दिनानिमित्त मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातिल कर्तबगार व्यक्तिचा गुण गौरव सोहळा संपन्न येथील मराठा समाजाचे संचालक, पत्रकार श्री शिवाजीराव मोहन पाटील यांनी सामाजिक, संस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांना “समाजभूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवन्यात आले तर के डी गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे शिक्षक समाधान रघुनाथ कंखरे यांनी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात उल्येखनिय कार्य केल्याने त्यांना “शिक्षण भुषण” पुरस्कारने मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवन्यात आले त्या वेळी मा आमदार रामहरी रुपनवर, मा विलासराव कोलेकर, मा श्री सुभाष घुले उपायुक्त प्रणन, प्रा. डॉक्टर कैलास करांडे डायरेक्टर सिंहगड इन्स्टिट्यूट, माननीय श्री किशोर भाई भंडारी संपादक ज्वाजल्य न्यूज, श्री प्रवीण काकडे, प्राध्यापक महादेव तळेकर, लुनेश विरकर संचालक आहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली वरील मान्यवर यांच्या हस्ते उपस्थितीत कर्तबगार व्यक्तींना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या सोहळ्याचे प्रास्ताविक स्वागत श्री विलासराव कोलेकर यांनी केले कार्यक्रमासाठी दीपक पोद्दार, अशोक शिंदे, दिनेश कांबळे, संजय गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले आभार बाबासाहेब राशिनकर यांनी मानले उत्कृष्ट सूत्रसंचालन प्राध्यापक कांबळे यांनी केले पंढरपूर येथील पांडुरंगाच्या चरण कमलांनी पावन झालेल्या पंढरी नगरीत पुरस्कार मिळाल्याने जीवन सार्थ झाले असी प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्त यांनी व्यक्त केली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh