केंद्राची नवीन योजना; महिला बचत गटांना मिळणार शेतीसाठी ड्रोन

केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आहे. २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत १५ हजार निवडक महिला बचत गटांना कृषी वापरासाठी शेतकऱ्यांना भाड्याने सेवा देण्यासाठी ड्रोन प्रदान केले जाणार आहेत.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, “गेल्या पाच वर्षांत सुमारे १३.५० कोटी भारतीय गरिबीच्या पातळीच्या वर पोहोचले आहेत. हे मोदी सरकारच मोठ यश आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना होती. ही योजना १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”