नोकरी वाचवण्यासाठी पोलिसाने मुलगी दिली दत्तक, हायकोर्टात याचिका

पोलीस निरीक्षकाने नोकरी वाचवण्यासाठी स्वतःची मुलगी दत्तक दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूरच्या बार्शी पोलीस ठाण्यातील निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केलेल्या या कृत्यावर आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

गिरीगोसावी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम, 2005 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी अॅड. तृणाल टोणपे व अॅड. अनिरुद्ध रोटे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. 1998 पासून महाराष्ट्र पोलीस दलात सेवेत असलेले गिरीगोसावी यांना 2005 नंतर तिसऱया अपत्याच्या रूपात मुलगा झाला. त्यामुळे 2005 मधील तरतुदींनुसार सरकारी नोकरीवर गदा येऊ शकते, या भीतीने गिरीगोसावी यांनी दुसरे अपत्य म्हणून जन्माला आलेली मुलगी दत्तक दिली. नोकरी वाचवण्यासाठी अशा पद्धतीने तीन अपत्य असल्याची माहिती लपवणे हे कृत्य बेकायदेशीर व असंवैधानिक आहे. याप्रकरणी गिरीगोसावी यांच्यावर कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी याचिकेत केली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh