भुसावळ येथे संविधान रॅलीत अनेकांचा सहभाग !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – येथे दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळ येथील महात्मा गांधी पुतळ्या पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत रॅली काढण्यात आली. यावेळी महिला व पुरुष तसेच असंख्य पदाधिकारी व संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच वकिल मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ. संजय सावकारे यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केला. यावेळी रॅलीत सहभागी सर्वान जवळ असलेले बॅनर व फलक लक्ष वेधून घेत होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh