गोंभी गावात नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांकडून साफसफाई !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव गृप ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या गोंभी गावातील ग्रामस्थांनी गाव स्वच्छ व सुंदर करण्याच्या कामास लागले असून नवनिर्वाचित सरपंच पती व नवनिर्वाचित सदस्य यांच्या कुटुंबातील तसेच गावातील बहूसंख्य तरुण एकत्र येऊन गावातील रस्ते साफसफाई व स्वच्छ करण्यात येत आहेत. दैव योगाने गोंभी गावातील काजल कोळी यांच्या गळ्यात लोकनियुक्त सरपंच पदाची माळ पडली आहे. त्यामुळे गोंभी गावातील ग्रामस्थांनी एकीचे बळ ही म्हण सत्यात उतरवली आहे आता गोंभी गावाचा विकास हाच ध्यास या प्रमाणे निस्वार्थीपणाने सर्व गोंभी ग्रामस्थ कामाला लागले आहेत. गोंभी येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या मागील बाजूस असलेला कचरा व स्मशानभूमी रस्त्याची सुध्दा साफसफाई करून घ्यावी असे सांगितले जात आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh