मोदींना पनवती म्हणणाऱ्या राहुल गांधींना निवडणूक आयोगाने बजावली नोटीस

नवी दिल्ली – राजस्थान विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या दरम्यान काँग्रेस व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू आहेत.दोन दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पनवती म्हटले होते. त्याचबरोबर विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभव मोदीमुळेच झाला असं जालौर येथील सभेत त्यांनी म्हटले होते. या टीकेनंतर भाजपने आक्रमक होत राहुल गांधींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने याची दखल घेत राहुल गांधी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

भारतीय टीम चांगला खेळ करत होती व त्यांनीविश्वचषक स्पर्धा जिंकली असती, मात्र पनवती तिकडे गेला व संघाला हरवले.असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.या वक्तव्यानंतर भाजपने राहुल गांधींवर कारवाईची मागणी केली होती.तसेच पंतप्रधानांबद्दल अपमानास्पद विधान अत्यंत अस्वीकार्य असून त्याबद्दल त्यांना माफी मागावी, अशीही मागणी केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने २५ नोव्हेंबरला संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.