विराट कोहली ‘या’ दिवशी होणार निवृत्त? करिअरबाबतचे सर्व अंदाज ठरले खरे

नवी दिल्ली – 2023 सालचा एकदिवसीय विश्वचषक भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप चांगला होता. 2023 च्या विश्वचषकात विराट कोहलीने एकूण 765 धावा केल्या आहेत. विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या कोणत्याही हंगामात एखाद्या फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

विराट कोहलीने 765 धावा करत इतिहास रचला. मात्र, अंतिम फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय संघाचा पराभव झाल्यापासून विराट कोहलीबद्दल बरीच चर्चा होत आहे. विराट कोहली किती दिवस एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार? या प्रकरणावर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. विराट कोहलीचा फिटनेस पाहता तो 2027 चा एकदिवसीय विश्वचषक खेळू शकेल असे मानले जात आहे. पण विराट कोहलीबाबत एका ज्योतिषाची भविष्यवाणी व्हायरल होत आहे.

ज्योतिषाने केली भविष्यवाणी

या ज्योतिषाने 2016 मध्ये विराट कोहलीबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. जी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये विराट कोहलीच्या सुरुवातीपासून ते निवृत्तीपर्यंतच्या कारकिर्दीचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की कोहली मार्च 2028 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो. या पोस्टमध्ये विराटच्या खराब फॉर्मपासून त्याच्या दमदार कमबॅकपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

भविष्यवाणीनुसार, असं लिहिलं होतं की, सप्टेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 हा टप्पा विराट कोहलीच्या कारकिर्दीत खूप वाईट टप्पा असेल आणि प्रत्यक्षात कोहलीला नोव्हेंबर 2019 ते सप्टेंबर 2022 दरम्यान एकही शतक झळकावता आले नाही.

तसंच, भविष्यवाणीनुसार विराट कोहली 2021 मध्ये बाउन्स बॅक करणार होता आणि त्याचा उत्कृष्ट फॉर्म 2025 पर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे. विराट कोहलीने सप्टेंबर 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 आशिया चषक स्पर्धेत तीन वर्षांनंतर शतक झळकावले आणि आतापर्यंत त्याच्याबाबतीत केलेली भविष्यवाणी ही खरी ठरली आहे.

विराट कोहली कधी घेणार निवृत्ती?

याशिवाय विराट कोहलीचे दुसरे अपत्य 2021 ते 2024 दरम्यान जन्माला येईल असा अंदाज आहे. आता हा अंदाज खरा ठरतो की नाही हे यचे आहे. मात्र, या अंदाजानुसार, विराट कोहलीच्या कारकिर्दीत पुन्हा एकदा ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2027 दरम्यान वाईट टप्पा येईल आणि कदाचित त्यानंतर तो निवृत्ती घेईल. आता ही भविष्यवाणी खरी ठरते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोहलीने केले अनेक विक्रम

2008 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत मोठं यश संपादन केलं आहे. त्याने आतापर्यंत 292 एकदिवसीय सामन्यांच्या 280 डावांमध्ये 50 शतके आणि 72 अर्धशतकं झळकावली आहेत. विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विश्वचषकातील एकदिवसीय शतकांचा विक्रमही मोडीत काढला. मात्र, दोन वर्षांपूर्वी खराब फॉर्ममुळे कोहलीला टीकेला सामोरे जावे लागले होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी