ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्ह्यातील विविध खासगी कंपन्या, आस्थापनांवरील १५० रिक्त पदांसाठी सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी २८ व २९ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्याचा तरूणांनी लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे यांनी केले आहे.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून सर्वसाधारण १० वी/ १२ वी/पदवीधर/आय टी आय ट्रेड / डिप्लोमा / बी.ई. डिप्लोमा ही शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांमधून कंपन्यांमधील १५० रिक्तपदांची भरती करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या ईच्छुक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. उमेदवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अॅप्लाय करण्यासाठी ‘सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग ईन करून अॅप्लाय करावा. तसेच ज्यांना नोंदणी केलेली नाही. त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-इन करुन अॅप्लाय करावा.

या बाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ९.४५ ते संध्या. ६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७ – २९५९७९० वर संपर्क साधावा. असे आवाहन ही श्री. मुकणे यांनी केले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh