सुनसगाव व गोंभी येथे सरपंच व सदस्यांकडून साफसफाई !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ  भुसावळ तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीत रस्सीखेच झाली यात दैवयोगाने गोंभी गावातील काजल कोळी यांच्या गळ्यात लोकनियुक्त सरपंच पदाची माळ पडली आता सर्व झाल्यावर सुनसगावकरांना पश्चातापा शिवाय काही उरले नाही. गोंभी गावाला सरपंच पद मिळाले त्यामुळे गोंभी येथील तरुणाई एकत्र झाली आणि आता विकासासाठी कंबर कसली जात आहे. इकडे सुनसगावात उपसरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार त्यांची शाळा भरवली जात आहे विशेष म्हणजे एका एकमेव पॅनल चे चार सदस्य निवडून आलेले आहेत तर निवडणुकीपूर्वी एका महिलेला उपसरपंच पदाची आशा दाखवली आहे. तसे पाहता अपक्ष पाच, पॅनल चे चार आणि लोकनियुक्त सरपंच अशी सुनसगाव – गोंभी ग्रामपंचायतीची परिस्थिती आहे . त्यामुळे चक्रव्यूहात कोण अडकणार हे वेळेवर लक्षात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र सध्या सर्व सदस्य गावातील साफसफाई व इतर कामांकडे लक्ष देत असले तरी ठराविकच नवनिर्वाचित सदस्य स्वताहून कामांकडे लक्ष वेधून आहेत त्यामुळे सध्यातरी गोंभी आणि सुनसगाव स्वच्छतेकडे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पदावर बसण्या अगोदर जर कामे होत आहेत तर मग पुढे अनेक योजना राबविल्या जाण्याची शक्यता आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh