भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2023) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी 10 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. चालक पदांच्या 18 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Researh Organisation)
भरले जाणारे पद – चालक
पद संख्या – 18 पदे
1. हलके वाहन चालक – 9 पदे
2. अवजड वाहन चालक – 9 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार10 वी पास असणे आवश्यक आहे.
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ISRO VSSC च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2. त्यानंतर ISRO VSSC Recruitment 2023 या लिंकवर क्लिक करा.
3. याठिकाणी रजिस्ट्रेशन करा. (ISRO Recruitment 2023)
4. पुढे गेल्यानंतर अर्ज भरा आणि आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा.
5. अर्जाची फी भरा.
6. फॉर्म तपासून सबमिट बटणावर क्लिक करा. हा फॉर्म प्रिंट करून घ्या.
आवश्यक कागदपत्रे –
1. उमेदवाराकडे वैध एलव्हीडी लायसन्स असणं गरजेचं आहे. तसंच तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव देखील आवश्यक आहे.
2. अवजड वाहन चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराकडे वैध एचव्हीडी लायसन्स असणं गरजेचं आहे. सोबतच, उमेदवाराकडे वैध सार्वजनिक सेवा परवाना असणं गरजेचं आहे.
3. या दोन्ही पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी/एसएसएलसी/एसएससी/मॅट्रिक उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – (ISRO Recruitment 2023)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in