दिवाळीनंतर सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी येऊ शकते. वास्तविक, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात, कारण कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण काही काळापासून दिसून येत आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीने गेल्या 4 महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आहे. 13 नोव्हेंबर रोजी क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरवर पोहोचली होती, त्यापूर्वी 13 जुलै रोजी ही किंमत प्रति बॅरल 82 डॉलर होती. सर्वोच्च किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 27 ऑक्टोबर रोजी ते प्रति बॅरल $ 96 होती.
किमती 17 टक्क्यांनी घसरल्या आहेत
याचा अर्थ गेल्या दोन आठवड्यात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 17 टक्क्यांनी घसरल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती इतक्या का कमी होत आहेत, यामागे 3 मोठी कारणे दिली जात आहेत. पहिले म्हणजे, अमेरिकेत कच्च्या तेलाचे उत्पादन पूर्वीपेक्षा कमी होत आहे, दुसरे म्हणजे, चीनच्या कमजोर आर्थिक स्थितीमुळे मागणीत घट होण्याची शक्यता आहे. कारण चीन हा जगातील सर्वात मोठा आयातदार देश आहे. तिसरे कारण म्हणजे चीनच्या रिफायन्सने सौदी अरेबियाला कमी तेलाचा पुरवठा करण्यास सांगितले आहे.
भारतासाठी आनंदाची बातमी
दरम्यान, या तीन कारणांमुळे गेल्या तीन आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमतीत झपाट्याने घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण ही भारतासाठी आनंदाची बातमी असली तरी यामागचे मुख्य कारण म्हणजे भारत आपल्या गरजेच्या 75 टक्के कच्च्या तेलाची आयात करतो. आता कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना, भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात नक्कीच कमी होतील.
दर कसे ठरवले जातात?
पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करुन सरकार सर्वसामान्यांना एक मोठी भेट देऊ शकते, असेही मानले जात आहे. कच्चे तेल 1 डॉलरने महाग झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 50 ते 60 पैशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यास भारतातही हीच घसरण दिसून येते.