दिपावली निमित्त सुनसगावच्या श्री विठ्ठल मंदिरात रोषणाई!

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात दिवाळी सणाच्या पावण पर्वावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे या रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे.

दरवर्षी या मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात येते मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा प्रथमच रंगीबेरंगी लाईटींग येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसरातील नवयुवक गृप मित्र मंडळाचे कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत करून या मंदिराच्या भोवती लाईट लावण्याचे काम करत असतात आणि दिवाळीच्या पावणपर्वावर मंदिरात रोषणाई निर्माण करतात.