रश्मिकाच्या ‘त्या’ प्रकरणानंतर मोदी सरकार आक्रमक! 3 वर्षांची शिक्षा अन् 1 लाखांचा होणार दंड

सध्या सोशल मिडियावर साउथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रश्मिकाचा व्हिडिओ समोर येताच खुद्द रश्मिकापासून ते अमिताभ बच्चनपर्यंत सर्वांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत व्हिडिओ एडिट करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

आता थेट केंद्र सरकारने या घटनेची गांभीर्याने घेतली आहे.

या प्रकरणात शासनानं माहिती व तंत्रज्ञान अॅक्ट २००० च्या ६६ डी नुसार संगणकाच्या मदतीनं एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्यास होणारी कारवाई. अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूद्वारे केलेला प्रयत्न ज्यामुळे संबंधित व्यक्तीची प्रतिमा फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातून मलिन केली जाईल त्यावर या अॅक्टनुसार कारवाई करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. त्यानुसार दोषीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल.

शासनाच्या त्या समितीनं सोशल मीडियावर रश्मिकाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याची बारकाईनं पाहणी केली आहे. त्यातून रश्मिका ही एका लिफ्टमधून बाहेर पडताना दिसते. तो व्हिडिओ बराचवेळ सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय होता.

प्रत्यक्षात त्या व्हिडिओची तपासणी केली असता तो ब्रिटिश इंडियन इन्फ्ल्युंसर झारा पटेलचा असल्याचे दिसून आले. तो व्हिडिओ तंत्रज्ञानाच्या मदतीनं मॉर्फ करण्यात आला होता. पटेलच्या जागी रश्मिकाचा फोटो वापरण्यात आला होता.

एखाद्या लोकप्रिय सेलिब्रेटीचा फोटो अशाप्रकारे मॉर्फ करण्यात येत असेल तर ती गंभीर बाब आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियातून पुढे आल्या आहेत. दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही पुढे आली आहे.

यावर रश्मिकाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. तिनं आपण जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा खूपच घाबरुन गेलो आणि आपल्याला खूपच मोठा धक्का बसला असे म्हटले आहे.

हे जे काही समोर आले आहे त्यामुळे मी खूपच दु:खी झाले आहे. अशा प्रकारे जर व्हिडिओ समोर येत असतील तर त्यावर आपण कशाप्रकारे कारवाई करणार आहोत असा प्रश्न तिनं उपस्थित केला आहे. मी केवळ माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या सारख्या आणि कित्येकजणी असतील ज्यांच्याबाबत हा प्रकार घडला असेल किंवा घडेल त्यांनी काय करावे, त्यासाठी आपण काही करणार आहोत की नाही, असेही रश्मिकानं विचारले आहे.

तंत्रज्ञानाचा अशाप्रकारे होणारा गैरवापर हा चूकीचा आहे. आजच्या घडीला जे काही होते आहे त्याला आपण जे सामोरं जात आहोत ते कशाप्रकारे आहे हे समजावून घ्यावे लागेल. रश्मिकाच्या या प्रकरणावर अमिताभ बच्चन यांनी देखील तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. दोषीवर कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी याबाबत सांगितले की, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यानी कोणतीही चुकीची माहिती पोस्ट केली जाणार नाही याची खात्री करावी. तसेच माहिती 36 तासांच्या आत काढून टाकली जावी.

“एप्रिल, 2023 मध्ये सांगितलेल्या IT नियमांनुसार, कोणत्याही युजर्सने कोणतीही चुकीची माहिती पोस्ट केली जाणार नाही याची खात्री करणे हे त्या प्लॅटफॉर्मसाठी बंधनकारक असेल. तसेच चुकीची माहिती 36 तासांत काढून त्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकण्यात यावी. मात्र जर या नियमांचे पालन झाले नाही तर प्लॅटफॉर्मवर आयपीसीच्या तरतुदींनुसार पीडित व्यक्ती न्यायालयात जाऊ शकते.

इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान प्रसारण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे की, मोदी सरकार अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई करण्यास सज्ज आहे. भारतीयांच्या सुरक्षेची हमी आता सरकारनं घेतली आहे. असेही चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh